Yashwantrao Chavan Essay Competition by MLC Satish Chavan

महाराष्ट्राचे भाग्यविधाते, राज्याचे पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांचे २०१२ हे जन्मशताब्दी वर्ष. यशवंतरावांच्या विचारांनी महाराष्ट्राला पुरोगामित्वाची दिशा दिली. महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये यशवंतराव चव्हाण यांचे फार मोठे योगदान आहे. त्यामुळेच तर महाराष्ट्र आज चौफेर क्षेत्रात प्रगती करीत आहे.
कर्तव्यदक्ष प्रशासक, साहित्याचे सहृदयरसिक, संवेदनक्षम मानुसप्रेमी, ज्ञानपिपासू, लोकशिक्षक व लोकनेते असे त्यांचे व्यक्तिमत्व होते. यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या राजकारणात देखील आपल्या कर्तुत्वाचा ठसा उमटविला आणि आपल्या दुरगामी निर्णयाने देशाचा लौकिक वाढविला. यशवंतराव चव्हाणांच्या कार्याला उजाळा मिळावा तसेच त्यांच्या कार्याची पुन्हा एकदा उजळणी व्हावी, यासाठी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी या नात्याने मी यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त भव्य आंतरमहाविद्यालयीन निबंध स्पर्धेचे आयोजन करीत आहे. तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे.

आपला

आ. सतीश चव्हाण
(मराठवाडा पदवीधर मतदारसंघ)

थोडक्यात यशवंतराव चव्हाण

१९१३: १२ मार्च सातारा जिल्ह्यातील (सध्या सांगली जिल्हा) देवराष्ट्रे या गावी जन्म.
१९१८: वडील बळवंतराव चव्हाण यांचे प्लेगने निधन. देवराष्ट्रे येथील प्राथमिक शाळेत चौथीपर्यंत शिक्षण व नंतर कर्हाेड येथे शिक्षणासाठी दाखल.
१९२७: कर्हारडच्या केंद्र शाळेतून व्हर्नाक्युलर फायनल परीक्षा पास. कर्हावडच्या टिळकहायस्कूलमध्ये प्रवेश.
१९२९: स्वातंत्र्यलढ्याला वाहून घेण्याचा निर्धार.
१९३०: दीड वर्ष ज्ञानप्रकाश वृत्तपत्राचे बातमीदार.
१९३०: असहकाराच्या (कायेदभंग) चळवळीत सहभाग व १८ महिन्यांच्या शिक्षा.
१९३३: मे महिन्यात तुरुंगातून सुटका.
१९३४: मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण. कोल्हापूरच्या राजाराम कॉलेजमध्ये प्रवेश.
१९३५: महाराष्ट्रातील समाजवादी पक्षाचे संस्थापक सदस्य.
१९३८: इतिहास व राजकारण हे विषय घेऊन मुंबई विद्यापीठातून बी.ए. प्राप्त.पुण्याच्या लॉ कॉलेजमध्ये प्रवेश.
१९३६: रॉयवादी विचारसरणीच्या छायेत.
१९४०: सातारा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष.
१९४१: एल.एल.बी. परीक्षा पास, वकिलीच्या व्यवसायास प्रारंभ.
१९४२: २ जून रोजी कर्हाचड येथे फलटण येथील मोरे कुटुंबातील वेणूताईंशी विवाहबद्ध.
१९४२: महात्मा गांधींच्या चले जाव आंदोलनात सामील.
१९४२: सातारा जिल्ह्यातील भूमिगत चळवळीत प्रवेश.
१९४३: सर्वांत थोरले बंधू ज्ञानोबा यांचे निधन.
१९४४: तुरुंगवास.
१९४५: तुरुंगातून सुटका.
१९४६: मुंबई इलाखा कायदे मंडळाच्या निवडणुकीत दक्षिण सातारा निवड.
१९४६: १४ एप्रिल रोजी गृहखात्याचे पार्लमेंटरी सेक्रेटरी म्हणून निवड.
१९४७: १५ डिसेंबर रोजी मधले बंधू गणपतराव यांचे निधन.
१९४८: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे चिटणीस.
१९५२: कर्हाषड मतदारसंघातून विधानसभेवर निवड, नागरी पुरवठा मंत्री म्हणून नियुक्ती.
१९५६: ऑक्टोबरमध्ये लोकसभेचा विदर्भासह विशाल द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना करण्याच्या बाजूने कौल.
१९५६: १ नोव्हेंबर रोजी विशाल द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना द्विभाषिक राज्याचे मुख्यमंत्री म्हणून निवड.
१९५७: एप्रिलमध्ये मुंबई विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत कर्हााड येथून विजयी व पुनश्च मुख्यमंत्रीपद.
१९५८: सप्टेंबरमध्ये अखिल भारतीय काँग्रेसच्या वर्किंग कमिटीवर निवड.
१९६०: एप्रिलमध्ये लोकसभेचे द्विभाषिक राज्याची पुनर्रचना करून मुंबईसह महाराष्ट्र व गुजराथ अशा दोन राज्यांच्या निर्मितीवर शिक्कामोर्तब
१९६०: १ मे रोजी महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री म्हणून शपथविधी
१९६०: नोव्हेंबरमध्ये अखिल भारतीय काँग्रेस निवडणूक मंडळावर निवड.
१९६१: जानेवारीमध्ये काँग्रेस महासमितीतून निवडणूक पद्धतीने प्रथमच झालेल्या निवडीत वर्किंग कमिटीवर निवड.
१९६२: फेब्रुवारीमध्ये महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत प्रचंड विजय.
१९६२: २२ नोव्हेंबर रोजी भारताचे संरक्षणमंत्री म्हणून सूत्रग्रहण.
१९६३: नाशिक जिल्ह्यामधून लोकसभेवर बिनविरोध निवड.
१९६५: १८ ऑगस्ट रोजी आई विठामाता यांचे निधन.
१९६६: १४ नोव्हेंबर रोजी केंद्रीय गृहमंत्रीपदी नियुक्ती.
१९७०: २६ जून रोजी केंद्रीय अर्थमंत्री म्हणून नियुक्ती.
१९७२: सातारा मतदारसंघातून लोकसभेवर निवड.
१९७४: ऑक्टोबरमध्ये केंद्रीय परराष्ट्रमंत्री म्हणून नियुक्ती.
१९७७: लोकसभेतील विरोधी पक्षाचे नेते म्हणून निवड.
१९७८: इंदिरा गांधी यांच्याबरोबर मतभेद होऊन संजीव रेड्डी काँग्रेसमध्ये प्रवेश.
१९७९: जुलैमध्ये चरणसिंग यांच्या संयुक्त मंत्रिमंडळात उपपंतप्रधान व गृहमंत्री.
१९८०: सातारा मतदारसंघातून लोकसभेवर निवड.
१९८२: इंदिरा काँग्रेसमध्ये प्रवेश.
१९८२: आठव्या अर्थ आयोगाचे अध्यक्ष.
१९८३: १ जून रोजी पत्नी सौ. वेणूताई यांचे निधन.
१९८४: २५ नोव्हेंबर रोजी दिल्ली येथे सायंकाळी ७.४५ वाजता निधन.
१९८४: २७ नोव्हेंबर रोजी कर्हाीड येथे कृष्णा-कोयनेच्या प्रीतिसंगमावर अंत्यसंस्कार.